‘दुष्काळाचा एकजुटीने सामना करा’

Contributed by: बीड,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘दुष्काळाचा एकजुटीने सामना करा’
‘दुष्काळात कोणीही लहान किंवा मोठा नसतो. पाणी, चारा आणि जनावरांच्या जगण्याचा प्रश्न सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत समाजात जातीधर्माच्या भिंती उभ्या करण्याऐवजी त्या मोडून काढण्याची आणि एकजुटीने दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा’, असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात केले.

मंगळवारी झालेल्या या मेळाव्यात बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकरी प्रश्न आणि सामाजिक सलोख्यावर त्यांनी भावनिक व आक्रमक शैलीत भाष्य केले. ‘माझ्या कातड्याचे जोडे करून तुम्हाला घातले, तरी तुमचे उपकार फिटू शकत नाहीत. हा दुष्काळातला मेळावा आहे. सीएसआर फंडातून चारा पोहोचवणे आणि अनुदानासाठी मी तुमची सावली बनून काम करीन,’ असे मुंडे म्हणाल्या.