(पान एकवरून)अभिनेता होता, अशी माहिती पुढे आली आहे. या अभिनेत्याला पोलिसांचे कायम संरक्षण असल्याने त्याला लक्ष्य करताना अडचणी येत होत्या. शूटर्स बोलावले, शस्त्रे मागवली आणि कटही रचला गेला होता. त्यामुळे फारशी सुरक्षा नसलेल्या टायगरला ऐनवेळी लक्ष्य करण्यात आले. टायगरला केवळ धमकावयाचे नव्हते तर ठार मारून दबदबा निर्माण करायचा होता, असेही म्हटले जात आहे.
अंधेरीच्या हॉटेलमध्ये वास्तव्य
फूलसिंग आणि रेहान हे दोघे २० दिवसांपूर्वी मुंबईत आले. त्यानंतर अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये हे दोघेही वास्तव्यास होते, असे चौकशीतून समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या हॉटेलच्या मालकाची चौकशी केली आहे. हे दोघे कोणत्या नावाने राहत होते तसेच इतर माहिती जाणून घेतल्याचे समजते.
दिशा पटनीच्या निवासस्थानी सुरक्षावाढ
बरेली : टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर अभिनेत्री दिशा पटनी हिच्या बरेलीतील निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिशाचे वडील जगदीश सिंह पटानी हे निवृत्त पोलिस उपाधीक्षक असून, त्यांच्या घरावर गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये गोळीबार झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सर्कल ऑफिसर आशुतोष शिवम यांनी पटनी यांच्या निवासस्थानी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली आणि तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.