(पान एकवरून) २,४०१ दुचाकींची भर पडली आहे. वडाळा आरटीओत (२,१४६), अंधेरीत (१,३५१) आणि बोरिवलीत ३१२ दुचाकी नोंदवण्यात आल्या आहेत. शहरात अनेक विकासकामे सुरू आहेत. नव्या मेट्रो मार्गिका आकार घेत आहेत. अन्य पायाभूत सुविधांमुळे रस्त्यांवर बॅरिकेड उभारून कामे सुरू आहेत. यामुळे कोंडी टाळण्यासाठीही सर्वसामान्य दुचाकी खरेदीला प्राधान्य देत असल्याचेे मानले जाते.