Bishnois Terrifying Attack On Tiger The Arrival Of Weapons
टायगरवरील हल्ल्यामागे बिष्णोईच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
(पान १ वरून)
मुंबई : टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबारासाठी वापरलेली शस्त्रे अमृतसर येथून आणण्यात आली होती. दिल्लीहून मुंबईत ही शस्त्रे पोहोचविण्याची जबाबदारी कुणाल आणि सुमीत याच्यावर सोपविण्यात आली होती. कुणालने यासाठी प्रेयसी आणि तिच्या मैत्रिणीचा वापर केला. राधा आणि बबिता या दोघी रेल्वेने दिल्लीहून शस्त्रे घेऊन दादरला उतरल्या आणि त्यांनी हल्लेखोरांपर्यंत ही शस्त्रे पोहोचवली. मात्र, या चौघांना ज्यांनी शस्त्रे पुरवली, त्यांना हे चौघे ओळखत नाहीत. या साखळीत प्रत्येक टप्प्यावरील आरोपी एकमेकांना ओळखत नाहीत, यालाच ‘डेड लेटर बॉक्स’ म्हटले जाते.टायगर याच्यावर गोळीबार करणारे शूटर्स फुल सिंग आणि रेहान हे दोघे अंधेरीत वेगवेगळ्या लॉजमध्ये राहत होते. अंकित आणि समीरही त्यांच्यासोबत काही दिवस होते आणि हल्ल्यापूर्वी निघून गेले. या हल्ल्यावेळी गोळी लागून जखमी झालेल्या उमेश चौहानवर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.