‘पुरावे असतील, तर यंत्रणांकडे द्या’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
eknath shindes response to manoj jaranges allegation of 500 crores
मुंबई : ‘आरोप करण्यापूर्वी मनोज जरांगेंनी त्याची शहानिशा करायला हवी होती. ५०० कोटी दिलेही नाहीत आणि घेतलेही नाहीत. त्यांच्याकडे पुरावे असतील, तर संबंधित यंत्रणांकडे द्यावेत,’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ५०० कोटींच्या आरोपावर शिंदे यांनी स्पष्ट उत्तर दिले.