Elphinstone School Renamed After Dr Jayant Narlikar 25 Government Technical Schools Get New Names
‘एल्फिन्स्टन’ विद्यालयासडॉ. जयंत नारळीकरांचे नाव
Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबईतील एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयाची ओळख आता बदलणार आहे. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे नाव या विद्यालयाला देण्यात येणार आहे. राज्यातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास सरकारने मान्यता दिली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने २१ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर केला.
दादर येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाला विश्वनाथ बेडेकर यांचे, तर विलेपार्ले पश्चिम येथील विद्यालयाला मोहनलाल चौहान यांचे नाव मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील विद्यालयांना माधवराव भिडे, माधवराव ओक, कृष्णा माळी आणि धरमपाल गुप्ता यांची नावे देण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यात तलासरी येथील विद्यालयाला महादेव अंधेर गुरुजी, तर जव्हार येथील विद्यालयाला नवसू दादा वळवी यांचे नाव दिले जाणार आहे. रत्नागिरीतील विद्यालयाला डॉ. धनंजय कीर आणि राजापूर येथील विद्यालयाला वासुदेव जोशी यांचे नाव मिळेल.रायगडमधील महाड, पेण आणि रोहा येथील विद्यालयांना अनुक्रमे सुरबानाना टिपणीस, जनरल अरुणकुमार वैद्य आणि पांडुरंगशास्त्री आठवले यांची नावे दिली जातील. सिंधुदुर्गात शिरगावातील विद्यालयाला अप्पासाहेब गोगटे यांचे नाव मिळेल.
नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमधील विद्यालयांनाही विविध महनीय व्यक्तींची नावे देण्यात येणार आहेत. त्यात डॉ. बाळकृष्ण मुंजे, अण्णासाहेब कदम, नानासाहेब पाटील, बालक्रांतिकारक शिरीषकुमार मेहता, डॉ. अविनाश आचार्य, कवीवर्य केशवसुत, भवरलाल जैन आणि दगडू राठोड यांचा समावेश आहे.