Two Youth And An Elderly Man Die In Motorcycle Accident In Satara
वृद्धासह दोन युवक भीषण धडकेत ठार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सातारा : मंगळवार आणि बुधवार खटाव गावकऱ्यांसाठी घातवार ठरले. खटाव येथील ओंकार ज्ञानेश्वर फडतरे (३२) हा युवक मंगळवारी रात्री दुचाकीवरून येताना अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. त्याच्यामागे वडील, आई, भाऊ, विवाहित बहीण, चुलते असा परिवार आहे. नुकताच त्याचा विवाह ठरला होता. ओंकारचा पोल्ट्री व्यवसाय असून, तो जरंडेश्वर कारखान्यातही काम करीत होता.
दुसऱ्या अपघातात सातारा-लातूर राज्य मार्गावर शिंदेवाडी येथे एसटी बस आणि एम८० यांचा अपघात झाला. यात खटाव येथील भंगार व्यावसायिक किरण दिलीप घाडगे (वय २९) आणि राजाराम सावंत (वय ७०) या दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. मृत किरणच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.