घरबांधणी अग्रिमाचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
approval of housing advance for district council employees
नागपूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरबांधणी अग्रिम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामविकास विभागाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार जिल्हा परिषद स्तरावर घरबांधणी अग्रिम वितरणाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना-६१५तर्फे गेल्या दहा वर्षांपासून ही मागणी शासनाकडे सातत्याने करण्यात येत होती. नव्या निर्णयानुसार उपलब्ध निधीच्या मर्यादेत पात्र कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम मंजूर करता येणार आहे. अर्ज, छाननी आणि निधी वितरणाची प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावर होईल. अग्रिमाची वसुली पंचायत राज सेवापद्धतीतून केली जाणार आहे. या निर्णयाचे स्वागत करीत राज्य कार्याध्यक्ष संजय धोटे यांनी शासनाचे आभार मानले.