ऑस्करवारीसाठी ‘गोंधळ’ची निवड

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
selection of gondhal film for oscars brings joy
नवी दिल्ली : संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची २०२७च्या ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (एफएफआय) शुक्रवारी याबाबतची घोषणा केली.

पी. शेषाद्री यांच्या अध्यक्षतेखालील १३ सदस्यीय ज्युरी मंडळाने देशभरातून आलेल्या ३३ चित्रपटांचे परीक्षण केल्यानंतर सर्वसंमतीने ‘गोंधळ’ची निवड केली. प्रमुख भूमिकांमध्ये किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहनी आणि निशाद भोईर यांचा समावेश आहे. विश्वविख्यात संगीतकार इलैयाराजा यांचे संगीत गोंधळ ला लाभले आहे.
लोकपरंपरेच्या वातावरणात मानवी नात्यांतील गुंतागुंत, संघर्ष आणि नाट्यमय घडामोडी मांडण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. ‘गोंधळ’च्या निमित्ताने मराठी चित्रपटाला ऑस्करच्या मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची चौथ्यांदा संधी मिळाली आहे.

 सविस्तर वृत्त... फ्रंट पेज २