Mamata Banerjees New Party Name And Symbols Football And Envelope
ममतांना ‘फुटबॉलपटू’, बंडखोरांना ‘लिफाफा’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे पक्षनाव आणि चिन्ह तूर्त गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शुक्रवारी दोन्ही गटांना नवी नावे आणि चिन्हांचे वाटप केले. त्यानुसार, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘ममता अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस ’ हे नाव आणि ‘फुटबॉल खेळाडू’ हे चिन्ह मिळाले आणि अरुप रॉय याच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि लिफाफा हे चिन्हे मिळाले आहे.
प. बंगालमध्ये सहा ऑक्टोबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना नवे नाव आणि पक्षचिन्हाचा वापर करता येईल. संबंधित वृत्त... फ्रंट पेज २