मुंबई : कोकणात गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी चार विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याची घोषणा मध्य आणि कोकण रेल्वेने केली आहे. सीएसएमटी ते सावंतवाडी रोड या मार्गावर विशेष फेऱ्या धावणार आहेत. याचे आरक्षण खुले झाले आहे. गाडी क्रमांक ०१००९ सीएसएमटीहून १९ आणि २६ सप्टेंबरला दुपारी १.४५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. परतीच्या प्रवासात (०१०१०) सावंतवाडी रोडहून २० आणि २७ सप्टेंबरला पहाटे ४.०५ वाजता सुटेल.