ड्रग्ज तस्करांची टोळी गजाआड

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
ड्रग्ज तस्करांची टोळी गजाआड
नागपूर : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने पाचपावलीतील ताजनगर परिसरात सापळा रचून ड्रग्ज तस्करांच्या टोळीतील चौघांना अटक केली. शेख इम्रान ऊर्फ बाबा शेख मुख्तार, शेख आबीद ऊर्फ आबू शेख अन्वर, फैजान रजा अब्दुल जब्बार शेख आणि मोहम्मद जुनेद मोहम्मद इब्राहीम राजवाडी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मंगळवारी रात्री गस्तीवर असताना पोलिसांना कार आणि ऑटोजवळ चौघे संशयास्पद स्थितीत उभे दिसले. पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडून २० किलो ५८५ ग्रॅम गांजा , रोख रक्कम, कार आणि ऑटो जप्त केला. हा गांजा कुख्यात तस्कर हॅप्पी ऊर्फ पाजी ऊर्फ हरप्रीत सैनी याने विक्रीसाठी आणल्याची माहिती आरोपींनी दिली. हॅप्पी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.