निवृत्त वायुसैनिक व कुटुंबीयांचा सन्मान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Times
नागपूर : भारतीय वायुसेनेसाठी दिलेल्या उल्लेखनीय आणि निस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वायुसेना देखभाल कमांड मुख्यालयात निवृत्त वायुसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देखभाल कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल यल्ला उमेश होते. निवृत्त वायुसैनिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि प्रचलित धोरणांच्या चौकटीत त्या सोडवणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी भारतीय वायुसेना कायम त्यांच्या पाठीशी उभी असून कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. एअर मार्शल यल्ला उमेश यांच्या हस्ते विंग कमांडर एस. के. जैन (निवृत्त), मानद फ्लाइंग ऑफिसर एम. एस. चव्हाण (निवृत्त) आणि दिवंगत वॉरंट ऑफिसर मारोती येवले यांच्या पत्नी संजीवनी येवले यांचा सत्कार करण्यात आला.