नागपूर : समाजात वाढत असलेल्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी इंडियन मुस्लिम फार्मा फाउंडेशन आणि सेंट्रल हॉस्पिटल, मोमिनपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कर्करोग जनजागृती शिबिर घेण्यात आले. या शिबिराला महिला व पुरुष नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. मुर्तुजा बोहरा उपस्थित होते. त्यांनी स्तनाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग तसेच इतर प्रकारच्या कर्करोगांची लक्षणे, कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि आधुनिक उपचारपद्धती याबाबत मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेंट्रल हॉस्पिटल, मोमिनपुरा व्यवस्थापन, इंडियन मुस्लिम फार्मा फाउंडेशनचे हाफिज खान, सरीन अहमद, अल्तमश राणा, इमरान खान, महंमद शाद, जुबेर अली, इमरान शेख, तोसिफ देशमुख, मोहतसिम, सलीम चुनावाला, शफीक खान आणि शहनवाज खान आदींचे सहकार्य लाभले.