कर्जबाजारी जिम ट्रेनरची हॉटेलमध्ये आत्महत्या

महाराष्ट्र टाइम्स
gym trainer commits suicide due to debt shocking incident
शेअर ट्रेडिंगमुळे कर्जबाजारी झालेल्या जिम ट्रेनरने मनीषनगर येथील ओयो हॉटेलमध्ये आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

प्रथमेश हेमंत शेंडे (वय २३, रा. ओमकार अपार्टमेंट, जयताळा), असे मृताचे नाव आहे. त्याचे वडील वर्धा पोलिस दलात हेडकॉन्स्टेबल आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रथमेश शेअर बाजारात गुंतवणूक करीत होता. त्याच्यावर सुमारे साडेतीन लाख रुपयांचे कर्ज झाले होते. त्यामुळे तो काही दिवसांपासून तणावात होता. मंगळवारी रात्री तो मनीषनगरमधील हॉटेलमध्ये थांबला. बुधवारी सकाळी मित्र व नातेवाइकांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. मोबाइल लोकेशनवरून ते हॉटेलमध्ये पोहोचले असता प्रकार उघडकीस आला. बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.