निर्णय आणि अंमल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
निर्णय आणि अंमल
सरकारी बैठकांमधून बटाटेवडे, चहा, बिस्किटे असे पदार्थ आणि पेय वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे वृत्त वाचले. शासकीय बैठका, कार्यक्रमांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, सोबतच शासकीय उपहारगृहांमध्येही हे पदार्थ मिळणार असल्याचे नमूद आहे. हे पदार्थ आणि पेय आरोग्याला हानिकारक असल्याचे कारण यामागे दिले आहे. त्याऐवजी पोषक आहार दिला जाणार आहे. फळे दिली जाणार आहेत. हा निर्णय स्वागतार्ह आहे, पण याची अंमलबजावणी सोपी नाही. विशेषत: चहा किंवा कॉफीबाबत हा निर्णय किती अमलात येतो हा प्रश्नच आहे.

- नितीन चव्हाटे, नागपूर
दरांचा दिलासा

साखरेच्या दरात घसरण झाली हे बरे झाले. दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढतीवर असल्या की घराचे बजेट कोलमडते. साखर, चहा, खाद्यतेल या वस्तूंच्या किमती मधल्या काळात वाढल्या. याची अनेक कारणे दिली गेली असली तरी वाढीव दरांचा फटका सामान्यांना; विशेषत: गरीब घटकाला बसतो. अशावेळी दर नियंत्रणात राहील यासाठी शासनाने कार्यवाही करण्याची अपेक्षा असते. साखरेबाबत आता सकारात्मक परिणाम दिसत आहे. अन्य वस्तूंबाबतही असेच व्हावे. मात्र यात कुठेही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.

- राकेश महाले, नागपूर

निर्णय आणि अंमल