Aitucs 20th State Convention Save Constitution Save Workers Rally In Nagpur
‘आयटक’चे राज्य अधिवेशन नागपुरात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नाशिक : ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) महाराष्ट्राचे २०वे राज्य अधिवेशन दि. ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या पोस्टरचे प्रकाशन दिल्ली येथे आयटकच्या राष्ट्रीय महासचिव अमरजीत कौर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार पी. संतोष कुमार, ॲड. सुभाष लांडे, डॉ. राम बाहेती, आयटकच्या राष्ट्रीय सचिव बबली रावत, आयटक महाराष्ट्रचे राज्य सरचिटणीस श्याम काळे आणि राज्य सचिव राजू देसले यांच्या हस्ते करण्यात आले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता बालभवन, नागपूर येथून ‘संविधान बचाव-कामगार बचाव’ रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली संविधान चौक येथे पोहोचणार आहे.तेथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्यभरातून सुमारे ५०० प्रतिनिधी दोन दिवसीय राज्य अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. तसेच आयटकशी संलग्न विविध युनियनचे हजारो कामगार, कर्मचारी व योजना कर्मचारी ‘संविधान बचाव-कामगार बचाव’ रॅलीत सहभागी होणार आहेत.