नवी दिल्ली : नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या विनाशकारी पुरानंतर २७५ भारतीय अद्याप बेपत्ता आहेत. आतापर्यंत १६६ नागरिकांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली. एक हजार ९०७ भारतीय नागरिक चीनमधून नेपाळमध्ये सुखरूप दाखल झाले आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे.