फाळके चित्रपट महोत्सवातून अभिषेक मिश्रा बाहेर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
फाळके चित्रपट महोत्सवातून अभिषेक मिश्रा बाहेर
दशकभराच्या वाटचालीनंतर अभिषेक मिश्रा यांनी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या संस्थेतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. भारतातील चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या संस्थेत मिश्रा १८व्या वर्षी यात सहभागी झाले होते.

‘एखाद्या गोष्टीचा शेवट हा एखाद्या नव्या गोष्टीची सुरुवात असते,’ अशी पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून करत मिश्रा यांनी ही माहिती दिली. मागील दशकभरात त्यांनी या महोत्सवाची ओळख आणि वाढीसाठी योगदान दिले. या काळातील अनुभवाने मला व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही स्तरांवर घडवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ‘संस्थेसोबतच्या माझ्या कार्यकाळात मला ‘विकास, दृष्टी, अर्थपूर्ण नातेसंबंध आणि अनुभव’ लाभले, जे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहतील,’ असे त्यांनी अधिकृत निवेदनात नमूद केले आहे.