‘असंघटितां’साठी कायदेशीर मदत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
free legal aid for unorganized workers new successful initiative in thane
ठाणे : रीच एज्युकेशन ॲक्शन प्रोग्राम डेव्हलपमेंट सेंटर आणि ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कळवा येथे ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लीगल एड क्लिनिक’चे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रवींद्र पाजनकर यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते.

येथे नागरिकांना वंचित व असंघटीत घटकांना मोफत कायदेशीर सल्ल्यासोबतच न्यायालयात मोफत वकील मिळवून देण्याची प्रक्रियाही सुलभ होणार आहे. त्यामुळे विशेषतः महिला आणि असंघटित कामगारांनी कोणत्याही भीतीशिवाय या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या केंद्राचा लाभ घेण्यासाठी लीगल एड क्लिनिक, न्यू शिवाजीनगर, खोली क्र. सात आणि आठ, मुकुंद कंपनी रोड, कळवा पूर्व येथे भेट द्यावी अथवा ८३६९८०८९१७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.