मुला-मुलीचा छळ; तीन जण अटकेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
harassment of boys and girls three accused arrested
जमुई (बिहार) : किशोरवयीन मुलगा आणि मुलीची रस्त्यात छेडछाड, तसेच छळ केल्याप्रकरणी बिहारच्या जमुई जिल्ह्यात पोलिसांनी सोमवारी तिघांना अटक केली. या घटनेत सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. मुलगा-मुलीची टोळक्याकडून छेड काढण्यात येत असल्याचा आणि मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली.

ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. मात्र, रविवारपर्यंत पीडितांनी तक्रार केली नव्हती. सोमवारी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहनाच्या नोंदणी क्रमांकाआधारे पोलिसांनी पीडितांचा शोध घेतला.