कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांच्या १०७व्या जयंतीनिमित्त त्यांच्या ‘चैत्रबन’मधील गाजलेल्या चित्रपट गीतांचा सुरेल कार्यक्रम ‘चला जाऊया चैत्रबनात’ गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.४५ वाजता शिवाजी पार्क येथील वीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. प्रविण शृंगारपुरे यांच्या ‘स्वर-नाद’तर्फे हा कार्यक्रम सादर करण्यात येणार असून ‘मटा कल्चर क्लब’ मीडिया पार्टनर आहे.
ग. दि. माडगूळकरांनी ‘चैत्रबन’विषयी लिहिताना या गीतांना लोकप्रिय करण्याच्या कार्यातील मोठा वाटा संगीतकार सुधीर फडके यांचा असल्याचे नमूद केले आहे.नीलिमा गोखले, विद्या करलगीकर, डॉ. जय आजगावकर, कल्पना संतोष आणि प्रविण शृंगारपुरे हे गायक ही गीते सादर करणार आहेत. सागर टेमघरे, झंकार कानडे, निषाद करलगीकर, विजू तांबे आणि जयंत बगाडे यांची संगीतसाथ लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन हेमंत बर्वे करणार आहेत. या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असून काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.