शि जिनपिंग करणार ट्रम्प यांच्याशी चर्चा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
शि जिनपिंग करणार ट्रम्प यांच्याशी चर्चा
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे २३ ते २५ सप्टेंबर या काळात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला भेट देणार आहेत, अशी घोषणा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सोमवारी केली. दौऱ्यादरम्यान जिनपिंग वॉशिंग्टनला भेट देणार असून, चार महिन्यांतील ही त्यांची दुसरी भेट ठरणार आहे. याचे वर्णन बीजिंगने ‘ऐतिहासिक महत्त्वाचा टप्पा’ असे केले आहे.

चीन-अमेरिका संबंध; तसेच जागतिक शांतता आणि विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा अपेक्षित आहे. याआधी दोन्ही नेते मे महिन्यात बीजिंगमध्ये भेटले होते. त्यावेळी जगातील दोन सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांमधील संबंध सुधारण्याच्या उद्देशाने त्यांच्यात चर्चा झाली होती.
दरम्यान, जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी, चीनचे उपपंतप्रधान हे लिफेंग, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीअर यांनी रविवारी न्यूयॉर्कमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसह आर्थिक व व्यापारी मुद्द्यांवर चर्चा केली.