नोएल टाटा यांचे प्रस्तावाविरोधी मत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नोएल टाटा यांचे प्रस्तावाविरोधी मत
‘ टाटा ट्रस्ट ’चे अध्यक्ष नोएल टाटा यांच्या विरोधानंतरही ‘ टाटा सन्स ’च्या संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून पाच वर्षांची मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली. मात्र, ‘टाटा ट्रस्ट’ने फेरनियुक्तीच्या ठरावाच्या वैधतेवर आक्षेप घेतला. निर्धारित कार्यपद्धतीनुसार, हा ठराव ‘कायदेशीरदृष्ट्या अमान्य’ असल्याचे ट्रस्टने म्हटले.

गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात ट्रस्टने सांगितले, की प्रस्तावाच्या बाजूने चार संचालकांनी मतदान केले, तर नोएल टाटा यांनी विरोधात मतदान केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता या निर्णयांना ‘टाटा सन्स’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) मंजुरी घेणे आवश्यक आहे. ‘टाटा सन्स’च्या संचालक मंडळावर टाटा ट्रस्टचे प्रतिनिधित्व करणारे वेणू श्रीनिवासन आणि नोएल टाटा हे या प्रक्रियेतील प्रमुख भागधारकांपैकी आहेत. श्रीनिवासन यांनी चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला आणि सूचिबद्धतेच्या प्रस्तावाला समर्थन दिले, असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेने यापैकी कोणताही प्रस्ताव फेटाळल्यास कंपनी कायद्यानुसार हे निर्णय लागू होणार नाहीत.