शेअर बाजाराची सावध प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
stock markets cautious response to federal reserves interest rate hike
अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात पाव टक्का वाढ केल्यानंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारांत सावध वातावरण राहिले. मुुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘ सेन्सेक्स ’ २१.८६ अंकांनी घसरून ७४,३१४.५९वर बंद झाला. ‘ निफ्टी ’ ५३ अंकांनी वधारून २३,२७०.६०वर स्थिरावला. एचडीएफसी बँक, टायटन, स्टेट बँक, भारती एअरटेल आणि ॲक्सिस बँक आदीसमभाग घसरले. भारत इलेक्ट्रॉनिक्स, इंटरग्लोब एव्हिएशन हे समभाग वधारले.