टाटा समूहात नेतृत्ववाद तीव्र

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
serious dispute against leadership in tata group
स्थिर नेतृत्वाची आवश्यकता

टाटा समूहाकडून रचनेचा आढावा
(पान १वरून)

ट्रस्टने म्हटले आहे. ‘संचालक मंडळाच्या बैठकीत एन. चंद्रशेखरन यांची फेरनियुक्ती करण्यासाठी मांडण्यात आलेला ठराव चार संचालकांच्या समर्थनाने आणि नोएल टाटा यांच्या विरोधातील मतदानामुळे, ‘ टाटा सन्स ’च्या तरतुदींनुसार कायदेशीरदृष्ट्या अमान्य ठरतो,’ असे ट्रस्टने म्हटले आहे. ‘टाटा सन्स’च्या प्रस्तावित सूचिबद्धतेचा मुद्दा ‘टाटा समूहा’तील मतभेदांचा प्रमुख विषय ठरला असल्याचे मानले जाते.

‘अध्यक्षाची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेत ट्रस्टच्या नामनिर्देशित संचालकांपैकी बहुसंख्य संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणे आवश्यक आहे,’ असे ट्रस्टने निवेदनात म्हटले आहे. ‘ही प्रक्रिया पहिल्यांदा होणाऱ्या नियुक्तीलाही आणि यापूर्वीच हे पद भूषवणाऱ्या व्यक्तीच्या फेरनियुक्तीलाही समानपणे लागू होते,’ असेही ट्रस्टने नमूद केले आहे.

स्थिर नेतृत्वाची आवश्यकता

व्यवसाय आणि नियामक घडामोडींच्या महत्त्वपूर्ण टप्प्यातून जात असलेल्या ‘टाटा समूहा’च्या सर्वोच्च नेतृत्वात सातत्य राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. फेब्रुवारी २०१७मध्ये रतन टाटा यांच्यानंतर चंद्रशेखरन ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष झाले. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी ते ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’चे (टीसीएस) सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने तंत्रज्ञान, वाहननिर्मिती, विमान वाहतूक, पोलाद, ग्राहक उत्पादने आणि वित्तीय सेवा यांसह विविध क्षेत्रांमध्ये विस्तार केला आहे. संचालक मंडळाचा हा निर्णय आवश्यक कॉर्पोरेट आणि भागधारक प्रक्रियांच्या अधीन आहे. फेरनियुक्तीच्या अटींबाबतची अधिक माहिती औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समोर येण्याची शक्यता आहे.

टाटा समूहाकडून रचनेचा आढावा

‘टाटा सन्स’ला ‘अप्पर-लेअर नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी’ म्हणून असलेल्या दर्जासंदर्भातील नियामक घडामोडींनंतर, होल्डिंग कंपनीची भविष्यातील रचना आणि शेअर बाजारातील सूचिबद्धतेबाबतही संचालक मंडळात चर्चा सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने ‘टाटा सन्स’ला ‘कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी’ म्हणून असलेली नोंदणी रद्द करण्याची विनंती यापूर्वी नाकारली होती. त्यामुळे समूहाच्या होल्डिंग कंपनीला लागू असलेल्या सूचिबद्धतेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक ठरले आहे. चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळासंदर्भातील हा निर्णय याच पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. सध्या ‘टाटा समूह’ आपल्या दीर्घकालीन कॉर्पोरेट रचनेचा आढावा घेत आहे.