पहिल्याच दिवशी अल्पसा प्रतिसाद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
nse ipo receives low response on first day
मुंबई : ‘राष्ट्रीय शेअर बाजारा’च्या (एनएसई) २.३ अब्ज डॉलरच्या ‘आयपीओ’ला गुरुवारी, बोलीच्या पहिल्याच दिवशी ४२ टक्के प्रतिसाद मिळाला. देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘आयपीओं’पैकी एक असलेल्या या इश्यूची सुरुवात काहीशी मंद राहिल्याचे दिसून आले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सायंकाळी ५.०३ वाजेपर्यंत गुंतवणूकदारांनी विक्रीसाठी उपलब्ध ८८.६ दशलक्ष समभागांच्या तुलनेत ३७ दशलक्ष समभागांसाठी बोली लावण्यात आली.

‘आयपीओ’साठी बोली लावण्याच्या कालावधीच्या शेवटच्या टप्प्यात मागणी वाढण्याची शक्यता असते. ‘एनएसई’चा आयपीओ २१ सप्टेंबरपर्यंत खुला राहणार असून, २४ सप्टेंबर रोजी समभाग बाजारात सूचिबद्ध होण्याची अपेक्षा आहे.‘प्रारंभीच्या मागणीच्या आकडेवारीचा फारसा अर्थ लावू नये. सध्या एकाच वेळी अनेक आयपीओ सुरू आहेत. संस्थात्मक गुंतवणूक दारांकडून खरेदी सुरू झाल्यानंतर या आयपीओला मिळणारा प्रतिसाद वाढेल,’ असे फिडेंट अ ॅसेट मॅनेजमेंटचे मुख्य गुंतवणूक अधिकारी ऐश्वर्या दधीच यांनी सांगितले.