Attack On Bjp Leader Bittus Convoy Near Batala Accusation Against Ruling Aam Aadmi Party Workers
बिट्टू यांच्या ताफ्यावर बाटलाजवळ हल्ला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
चंडीगड : भाजप नेते रवनीतसिंग बिट्टू यांच्या ताफ्यावर पंजाबमधील बाटलाजवळ काही जणांनी हल्ला केला. ‘नशा मुक्त पंजाब यात्रा’ सुरू करण्यासाठी पठाणकोटकडे जात असताना हा प्रकार घडला. हल्लेखोरांनी वाहनांवर अंडी व टोमॅटो फेकून काचा फोडल्या. या हल्ल्यामागे सत्ताधारी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप बिट्टू यांनी केला असून, पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अटकेतील अमेरिकी नागरिकाला जामीननवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दहशतवाद कट प्रकरणात अटकेत असलेला अमेरिकी नागरिक मॅथ्यू आरोन व्हॅन डायक याला दिल्ली न्यायालयाने डिफॉल्ट जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मिळाला असून, त्याला दिल्ली सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच्यावर बेकायदा प्रवेश आणि परदेशी कायद्यान्वये आरोप ठेवण्यात आले आहेत.
सोन्याच्या मुद्रेसह
तीन जण ताब्यात
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एका कारवाईत एका महिलेसह तिघांना अटक करून त्यांच्याकडून ५००हून अधिक सोन्याची नाणी जप्त केली. मिरबाजार भागात एका मध्य प्रदेश पासिंगच्या वाहनाची तपासणी करताना ही कारवाई करण्यात आली. काझीगुंडहून श्रीनगरकडे जाणारे हे वाहन जप्त करण्यात आले आहेत.