मोबाइलसाठी हटकल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मोबाइलसाठी हटकल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
नागपूर : मोबाइल पाहण्यावरून वडिलांनी हटकल्याने १५ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. भूमिका, असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती दहावीत शिकत होती. गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास भूमिका मोबाइल पाहत होती. त्या वेळी वडिलांनी तिला हटकले. याचा राग आल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. पहाटे ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.