मुंबई : ‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख आपले ‘परममित्र’ असा करतात; परंतु हे भारताची धोरणे बदलण्यासाठी भारताला १०० टक्के टेरिफ, निर्बंध व आर्थिक दबावाची धमकी का देतात,’ असा उपरोधिक प्रश्न विचारून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.
ट्रम्प यांनी रशिया आणि इराणला लक्ष्य करणाऱ्या ‘लिंडसे ओ. ग्रॅहॅम सँक्शनिंग रशिया अँड इराण अ ॅक्ट ऑफ २०२६’ या व्यापक निर्बंध विधेयकावर स्वाक्षरी करून त्याचे कायद्यात रूपांतर केले आहे. यामुळे रशियाकडून कच्चे तेल व नैसर्गिक वायूची खरेदी सुरू ठेवणाऱ्या भारतासारख्या देशांवर १०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आणि दंडात्मक कारवाईचे अधिकार ट्रम्प प्रशासनाला मिळाले. यावरून आंबेडकर यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारले आहेत.