30 Teachers Honored With Ideal Guru Ratna Award In Vidarbha
३० शिक्षकांचा ‘गुरुरत्न’ने गौरव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
औदुंबर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेतर्फे विदर्भातील ३० शिक्षकांना ‘आदर्श गुरुरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम झाला. आमदार विकास ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व डॉ. सुहासिनी वंजारी यांना ठाकरे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सोमलवार हायस्कूल, रामदासपेठच्या विद्यार्थ्यांनी सैनिकी मानवंदना दिली. रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, सुवतीदेवी झुनझुनवाला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी समूहनृत्य, तर स्व. प्रकाश उमाठे शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.कार्यक्रमात डॉ. मंदा उमाठे, डॉ. प्रज्ञा देशपांडे, डॉ. वंदना बडवाईक, मेधा नवसाळकर, अमेय एदलाबादकर, कविता पवार, शालिनी तेलरांधे, डॉ. शारदा रोशनखेडे, प्राचार्य सुभाष खाकसे, डॉ. पितांबर उरकुडे, डॉ. शुभ्रा रॉय, कॅ. विजय नाईक, लक्ष्मी मोझरकर, संजय पुंड, आरती भोसले, डॉ. शारदा मांडवगडे, श्रीवंत शेंडे आदींना विशेष गुणरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
दुसऱ्या सत्रात माजी आमदार सुधाकर कोहळे, मानव विकास संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जोध, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अजय अग्रवाल, प्राचार्य उदय टेकाडे, उपशिक्षणाधिकारी रमेश हरडे व गौतम गेडाम, हरीश अरोरा, शरद देशमुख, अनिल अहिरकर यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. आयोजिका भाग्यश्री पवार यांनी प्रास्ताविक केले. आर. जे. मोना यांनी संचालन केले, तर शालिनी तेलरांधे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक, त्यांचे कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.