दीड लाखाची रोकड एटीएममधून लंपास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
rs 15 lakh looted from atm in nagpur
नागपूर : प्लास्टिकची पट्टी लावून एटीएममधून दीड लाखांची रोकड लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कॅनरा बँकेच्या शाखा व्यवस्थापक दिव्यांशा सीताराम मीना (वय ४०, रा. अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहत, वाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. हुडकेश्वरमधील बँकेच्या एटीएममधून पैसे निघत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी बँकेत केल्या होत्या. त्यानंतर मीना यांनी १२ ते १४ सप्टेंबरदरम्यानचे एटीएममधील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात दोन अज्ञात आरोपींनी प्लास्टिक पट्टीचा वापर करून ४१ ग्राहकांचे एक लाख ५२ हजार रुपये काढल्याचे समोर आले. यानंतर मीना यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.