लातूर : संचालकपदाच्या कार्यकाळाची १० वर्षांची मुदत संपल्यामुळे लातूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदावरून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अन्य सात संचालकांना हटवावे, असा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला. पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.