मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Times
मुंबई : देशातून नैर्ऋृत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याचे शनिवारी भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. पश्चिम राजस्थानतून मान्सून माघारी फिरला आहे. पंजाब, सौराष्ट्र, कच्छ येथून आणखी तीन-चार दिवसांत मान्सून माघार घेईल, अशी चिन्हे दिसत आहेत.