‘डिजिटल सापळ्यात पकडले’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
raj thackerays open letter on digital trap
मुंबई : ‘केंद्र सरकारने यूपीआय व्यवहारांवर ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (एमडीआर) अर्थात, यूपीआय व्यवहारांवर शुल्क लावून भारतीयांवर ‘ डिजिटल सापळा ’ लावला आहे,’ अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी ‘एक्स’वरून केली.

‘आधी नोटबंदी करून मग आता आम्ही कसे डिजिटल व्यवहाराला चालना देतोय हे दाखवून यूपीआय व्यवस्था आणली. मग त्याचा गाजवजा केला, स्वतःची स्तुती करून घेतली, लोकांना सवय लावली आणि अचानक एके दिवशी घोषित केले, की आता या व्यवहारांवर शुल्क लागेल. थोडक्यात नागरिकांना गुंगवून ठेवले व हळूच ‘डिजिटल सापळ्यात’ पकडले. व्यापाऱ्यांनी ‘एमडीआर’चा विरोध करावा,’ असे आवाहन ठाकरे यांनी केले.