A New Milestone Of Glory Indias Grand Victory Over Kazakhstan
भारताची कझाकिस्तानवर मात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागोया : भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला सांघिक बॅडमिंटनमध्ये कझाकिस्तानचा ३-० असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता भारताचा सामना यजमान जपानशी होणार आहे. जपानच्या संघात अकाने यामागुची, तोमोका मियाझाकी आणि नोजोमी ओकुहारा अशा अनुभवी खेळाडू आहेत.
एकेरीत पी. व्ही. सिंधू , उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी एकही गेम न गमावता भारताला शानदार विजय मिळवून दिला. सिंधूने पहिल्या सामन्यात कमिला स्मागुलोव्हाचा २१-७, २१-९ असा पराभव केला. त्यानंतर उन्नतीने अलिसा कुलेशोव्हावर २१-७, २१-१० अशी मात केली. तन्वीने डायना नामेनोव्हाचा २१-५, २१-१० असा पराभव करून भारताचा विजय निश्चित केला.