दारूसाठी पैसेेन दिल्याने वार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
young man attacked with a knife for not giving money for alcohol
भोर : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका तरुणाच्या डोक्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली.

पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर गावच्या हद्दीत शनिवारी ही घटना घडली. या प्रकरणी भूषण अनिल वाल्हेकर (रा. नसरापूर) याच्यावर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निरंजन दीपक वाल्हेकर यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पोल्ट्री व्यावसायिक आहेत. शनिवारी दुपारी काम संपवून ते घराकडे जात असताना भैरवनाथ मंदिराजवळ भूषणने त्यांना दारूसाठी पैसे मागितले. फिर्यादींनी पैसे देण्यास नकार देताच, चिडलेल्या भूषणने लांब पात्याच्या धारदार चाकूने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. त्यांनी बचाव करण्यासाठी हात पुढे केला असता त्यांच्या हातावरही वार करण्यात आले. राजगड पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.