‘वाटद डिफेन्स क्लस्टरबाबत अहवालानंतर निर्णय’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
watsa defense cluster positive consideration by government local feedback important
रत्नागिरी तालुक्यात प्रस्तावित वाटद एमआयडीसीबाबत सरकार सकारात्मक पावले उचलत असून आठ दिवसांत येथे प्रस्तावित असलेल्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पाबाबत प्रांताधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतरच योग्य तो अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी सोमवारी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

‘मी आधी येथील आमदार आहे आणि नंतर उद्योगमंत्री आहे. त्यामुळे लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही’, अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘वाटद एमआयडीसी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध नाही. वाटद एमआयडीसी संघर्ष विरोधी कृती समितीसोबत आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही लोकांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार आहोत’, असं ते म्हणाले. या प्रकल्पाबाबत जनजागृती आणि शंकांचे निरसन करण्यासाठी सरकारकडून गावागावात संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. वाटद येथे प्रस्तावित असलेल्या डिफेन्स क्लस्टरमुळे जर गावकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध येणार असतील, तर या प्रकल्पाचा फेरविचार केला जाईल, अशी महत्त्वाची भूमिका सामंत यांनी मांडली.
‘जरांगे यांच्या १२ आंदोलनांचा मी साक्षीदार आहे. ओबीसी समाजावर अन्याय न करता आम्ही प्रश्न सोडवणार आहोत. ९० दिवसांनंतर त्यांना पुन्हा आंदोलन करावे लागू नये, अशी सरकारची भूमिका आहे’, असे ते म्हणाले.