पिंपरी : ‘मराठवाड्याच्या विकासात शिक्षण क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असून, शिक्षणामुळे व्यक्तीच्या आयुष्याला दिशा मिळते. शिक्षित समाजातूनच व्यापक सामाजिक परिवर्तन घडू शकते. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे,’ असे मत शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी या वेळी व्यक्त केले.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाडा जनविकास संघ आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम महोत्सव समिती, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने काळेवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भाऊसाहेब जाधव, डॉ. विवेक मुंगळीकर यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विक्रम गायकवाड, अर्चना देशमुख, दयानंद बळकटे, भाई धनंजय पाटील, अक्षता सूर्यवंशी यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.