Mumbai Municipal Corporations 14 Feet High Slum Demolition Clarification Needed From Ruling Bjp shiv Sena
झोपड्यांबाबत भूमिका स्पष्ट करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबई महापालिकेने १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्याच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी भाजप-शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेला स्थगिती द्यावी, अशी मागणीही शेख यांनी केली.
‘राज्य व मुंबई महापालिकेतही भाजप-शिवसेना सत्तेत आहेत. १८ फुटांपर्यंतच्या झोपड्या नियमित कराव्यात आणि १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांना संरक्षण द्यावे, अशी भूमिका निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी घेतली होती. मात्र, आता १४ फुटांपेक्षा उंच झोपड्यांवर १ ऑक्टोबरपासून कारवाई करण्याचा निर्णय का घेण्यात आला,’ असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला.