Vegetable And Flower Prices Drop Demand For Pomegranate Rises
भाज्यांसह फुलांचे दर घटले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पालेभाज्यांचे शेकड्यातील दर (रुपयांत) :
फळांचे दर (रुपयांत) :अनेक घरांमधील गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्याने गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये भाज्या आणि फुलांची मागणी घटल्याने दरही घटले आहेत. भाजीपाल्याची आवक स्थिर असून, मागणी कमी असल्याने दरही स्थिर आहेत. फळांना मागणी असल्याने दर काहीसे वाढलेले आहेत.
छत्रपती श्री शिवाजी मार्केट यार्डमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून शंभर ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, बंगळुरू येथून आले दोन टेम्पो, कर्नाटकातून कोबी चार टेम्पो, गुजरात आणि कर्नाटकातून भुईमूग शेंग पाच टेम्पो, इंदूर येथून गाजर १० टेम्पो, कर्नाटक येथून कोबी आणि घेवडा तीन टेम्पो, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून शेवगा तीन ते चार टेम्पो, मध्य प्रदेशातून लसूण सुमारे १० टेम्पो, इंदूर व आग्रा येथून बटाटा ४० टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले सुमारे ५०० गोणी, भेंडी पाच टेम्पो, कोबी आणि गवार प्रत्येकी पाच टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट्स, काकडी आठ टेम्पो, फ्लॉवर, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, तांबडा भोपळा प्रत्येकी १० टेम्पो, गाजर तीन ते चार टेम्पो, मटार ३००, घेवडा, शेवगा आणि पावटा प्रत्येकी सुमारे दोन टेम्पो, कांदा सुमारे ८० टेम्पो आवक झाली.
डाळिंबांचा हंगाम संपल्याने आवक निम्म्यावर आली आहे. गणेशोत्सवामुळे डाळिंबांना मागणी असल्याने दरांत वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे; तर कोथिंबिरीच्या तीन लाख जुडी आणि मेथीची ६० हजार जुडी आवक झाली.