Congress Faces Major Setback In Buldhana Rahul Bondre Joins Bjp
बुलढाण्यात काँग्रेसला धक्का
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
काँग्रेसला बुलढाणा जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. चिखलीचे माजी आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल बोंद्रे यांनी रविवारी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
बोंद्रे यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू होतीच; अखेर स्वतः बोंद्रे यांनीच या चर्चेला दुजोरा दिला.बोंद्रे यांनी आपल्या पोस्टमधून जुन्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. बुलढाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जिल्हा असल्याने बोंद्रे यांच्या पक्षांतराला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघात बोंद्रे आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्यातील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमीही आहे. त्यामुळे बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशानंतर स्थानिक राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे. बोंद्रे यापूर्वी चिखली मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. सन २०२४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली. या पक्षांतरामुळे काँग्रेसला बुलढाण्यातील संघटनात्मक पातळीवरही आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.