Inauguration Of Samavesh Ai And Digital Skill Lab In Pune Is Important
‘समावेश’च्या कौशल्य प्रयोगशाळेचे उद्घाटन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पिंपरी : ग्रामीण, आदिवासी, दिव्यांग, स्थलांतरित कुटुंबांतील आणि पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, कौशल्ये आणि करिअरच्या संधी अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने समावेश या संस्थेने पुण्यात ‘समावेश’ एआय आणि डिजिटल कौशल्य प्रयोगशाळा सुरू केली आहे.
या लॅबचे उद्घाटन ब्रिटिश उप-उच्चायुक्तालय, मुंबईचे हेड ऑफ पॉलिटिकल अँड बायलॅटरल अफेअर्सचे जॉन निकेल यांच्या हस्ते करण्यात आले. ‘समावेश’ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाकडे केवळ प्रवेशापुरते मर्यादित न ठेवता, शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या निर्माण होणाऱ्या व्यापक संधी दृष्टिकोनातून काम करते. शाळा, महाविद्यालये, समुदाय आणि सरकारी यंत्रणांसोबत भागीदारी करून संस्था विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन, करिअर समुपदेशन, मेंटॉरिंग, कौशल्य विकास आणि आवश्यक कायदेशीर कागदपत्रांसाठी साह्य पुरवते.‘समावेश’चे संस्थापक प्रवीण निकम म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा आत्मविश्वासाने वापर करता आला पाहिजे, ‘एआय’सारख्या नव्या साधनांची समज असली पाहिजे आणि कौशल्ये विकसित झाली पाहिजेत. या लॅबच्या माध्यमातून माजिक-आर्थिक पार्श्वभूमी आणि भविष्यातील संधी यांच्यातील अंतर कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’