Repair Of Dr Babasaheb Ambedkar Memorial Is Essential
‘लंडनमधील स्मारक दुरुस्त करावे’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबई : ‘लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या देखभाल व संवर्धनासाठी आवश्यक दुरुस्तीची कामे व्हावीत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू,’ असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
आठवले यांनी २० सप्टेंबर रोजी या संग्रहालय-स्मारकाला भेट देऊन पाहणी केली आणि डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकारातून किंग हेन्री रोडवरील हे स्मारक विकसित केले आहे.