ऋषभ दाससहाव्या स्थानी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
rishabh das secures sixth place at asian games
टोकियो : भारताच्या ऋषभ दासने रविवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोकच्या अंतिम फेरीत ५४.७७ सेकंदांची वेळ नोंदवून सहावे स्थान मिळवले.

सुवर्णपदक विजेत्या चीनच्या श्यू जियायूपेक्षा दास २.७९ सेकंदांनी मागे राहिला. श्यूने ५१.९८ सेकंदांची वेळ नोंदवली. जपानच्या हिदेकाझू ताकेहाराने (५३.९३ से.) रौप्यपदक, तर दक्षिण कोरियाच्या ली जुहोने (५३.९४ से.) ब्राँझपदक मिळवले. पात्रता फेरीत दासने ५४.८५ सेकंदांची वेळ नोंदवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तो एकूण क्रमवारीत पाचव्या स्थानावर राहिला होता. भारताचा उत्कर्ष पाटील ५६.१९ सेकंदांच्या वेळेसह १२व्या स्थानावर राहिला. पुरुषांच्या १०० मीटर फ्री स्टाइलच्या पात्रता फेरीत बेनेडिक्शन बेनिस्टन ५०.२५ सेकंदांसह १२व्या, तर आकाश मणी ५०.८५ सेकंदांसह २३व्या स्थानावर राहिला.