भारताच्या दोन्ही संघांची पाकिस्तानवर मात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
भारताच्या दोन्ही संघांची पाकिस्तानवर मात
टोयोटा : भारताच्या महिला आणि पुरुष टेबल टेनिस संघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत आपापल्या पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्यांचा ३-० असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सुतीर्था मुखर्जीने अलीना खानचा ११-३, ११-३, ११-४ असा, सिंड्रेला दासने कलसूम खानचा ११-६, ११-७, ११-५ असा, तर श्रीजा अकुलाने फातिमा खानवर ११-४, ११-४, ११-५ असा विजय मिळवला. यानंतर भारतीय पुरुष संघाने पहिल्या सामन्यात इराणकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानवर सहज मात करून पुनरागमन केले. हरमीत देसाईने पाकिस्तानच्या महंमद खानचा ११-४, ११-३, ११-५ असा पराभव केला. यानंतर कर्णधार जी. साथियनने अब्बास खानला ११-१, ११-८, ११-९ असे नमवले. पायस जैनने महंमद खानला ११-२, ११-५, ११-७ असे नमवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.