‘आर्य समाजाचा दाखला पुरेसा नाही’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
arya samaj marriage certificate is not valid allahabad high court ruling
लखनौ : ‘आर्य समाज मंदिराकडून देण्यात आलेल्या विवाह प्रमाणपत्रामुळे हिंदू विवाह झाला असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही; हिंदू विवाह कायद्यानुसार निर्धारित आवश्यक विधी पार पडले असतील तरच असा विवाह वैध मानला जाऊ शकतो,’ असा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी दिला.

वैवाहिक स्थितीबाबत खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) अधिकारी रोहित पांडे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. ही कारवाई रद्द करताना न्यायमूर्ती राजीव सिंह यांनी हा निकाल दिला. सुचेता तिवारी या महिलेने पांडे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीवरून पांडे यांच्यावर कारवाई झाली होती.