भारतीय पुरुषांची बांगलादेशवर मात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
भारतीय पुरुषांची बांगलादेशवर मात
भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने बांगलादेशचा ३-० असा पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लक्ष्य सेन , आयुष शेट्टी आणि किदाम्बी श्रीकांत यांनी सहज विजय मिळवले. आता उपांत्यपूर्व फेरीत भारताची लढत आज, मंगळवारी यजमान जपानशी होणार आहे. भारतीय महिला संघाचीही उपांत्यपूर्व फेरीत जपानशीच लढत होणार आहे.

लक्ष्य सेनने इब्न अयमान जमानला २१-४, २१-१२ असे नमवले. आयुष शेट्टीने गौरब सिंगवर २५ मिनिटांत २१-४, २१-१३ अशी, तर श्रीकांतने जुमार अल् अमिनवर २१-१५, २१-९ अशी मात केली.