Bavankules Important Instructions For Fodder Camps
बावनकुळे यांच्या सूचना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
चारा छावणीचा प्रारंभिक प्रस्ताव हा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात यावा. त्यासाठी जिल्हा परिषद सीईओ, कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांची समिती करून तो अंतिम करावा. सचिवस्तरावरही त्यावर नियंत्रण करण्यात येईल. चाऱ्यावर देशातील अन्य राज्यांत करण्यात येणाऱ्या उपाययोजना तपासून महाराष्ट्रासाठी एक चांगली चारा योजना तयार करावी. यासाठी तीन विभागांच्या सचिवांची समिती मुख्य सचिवांनी नेमावी, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.