समाजातील दुष्प्रवृत्तींचा परामर्श

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,नाशिक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
समाजातील दुष्प्रवृत्तींचा परामर्श
१९८५ च्या काळातील घटनांद्वारे समाजविघातक बाबींचा परामर्श ‘शेवंता जित्ती हाय’ या नाटकातून घेण्यात आला. नाटकाच्या रहस्यमय कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

६५ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत श्री रंग अवधूत शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. २१) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा प्रयोग झाला. लेखन प्रल्हाद जाधव यांचे, तर दिग्दर्शन अविनाश नागरे यांचे होते. प्रामाणिक व सामाजिक भान असलेले शाळा मास्तर समाजातील वाईट चालीरीतींविरोधात प्रबोधन करीत असतात. त्यात त्यांना त्यांची मैत्रीण साथ देत असते; पण ती अचानक गावातून बेपत्ता होते. त्यामुळे मास्तर कोलमडतात व तिचा शोध घेताना त्यांना स्त्रियांवरील अत्याचार, अवैध धंदे, भ्रष्टाचार, शोषण आदी समाजविघातक बाबींचा उलगडा होत जातो, असे नाटकाचे कथानक होते. नाटकात अर्चना गवांदे, अविनाश नागरे, डॉ. दीपक जाजू, योगेश पाटील, विकास पालखेडकर, डॉ. अविनाश धर्माधिकारी, मनोज बागूल, अजय पगार, श्रीराम कुलकर्णी, गीतांजली नाईक, उज्ज्वला पाटील यांच्या भूमिका होत्या. संगीत तेजस बिल्दीकर यांचे, प्रकाशयोजना जयदीप पवार यांची, तर नेपथ्य मनोज बागूल यांचे होते.
आजचे नाटक :

मृत्यू आधीच आला होता

(सरदार चौक मित्रमंडळ)